होमपेज › Nashik › नाशिक-पुणे बसफेर्‍या रद्द

नाशिक-पुणे बसफेर्‍या रद्द

Published On: Aug 01 2018 1:29AM | Last Updated: Aug 01 2018 1:29AMनाशिक : प्रतिनिधी 

सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या पुणे बंदला हिंसक वळण लागून समाजकंटकांनी नाशिक-पुणे महामार्गावर एसटी व इतर प्रवासी वाहनांची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली होती. बंदचा परिणाम दुसर्‍या दिवशीही जाणवला. त्यामुळे मंगळवारी (दि.31) नाशिकहून पुण्यासाठी सोडल्या जाणार्‍या 80 बसेसच्या फेर्‍या रद्द कराव्या लागल्या.

मागील काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण द्यावे. या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यभर आंदोलन सुरू आहे. काही ठिकाणी शांततेत तर काही ठिकाणी बंदला गालबोट लागले. समाजकंटकांकडून एसटी बसेसला टार्गेट केले जात आहे. सोमवारी पुणे बंदची हाक देण्यात आली होती. चाकण येथे बंदला हिंसक वळण लागले होते. समाजकंटकांनी 25 बसेसची जाळपोळ करण्यात आली. मंगळवारीही बंदचा मोठा परिणाम पहायला मिळाला. या मार्गावरील एसटी सेवा विस्कळीत झाली होती. नवीन सीबीएस येथून पुणे मार्गावर शिवशाही बसेस धावतात. मात्र, एसटीची तोडफोड लक्षात घेता या मार्गावरील 80 बस फेर्‍या रद्द करण्यात आल्या होत्या.  त्यामुळे नाशिकहून पुण्याकडे जाणार्‍या प्रवाशांची मोठी कोंडी झाली.