होमपेज › Nashik › नाशिकचे पोलिस आयुक्त  डॉ. सिंगल 'आयर्नमॅन'

नाशिकचे पोलिस आयुक्त  डॉ. सिंगल 'आयर्नमॅन'

Published On: Aug 27 2018 10:56AM | Last Updated: Aug 27 2018 10:58AMनाशिक : प्रतिनिधी

जगभरातील सर्वात खडतर समजली जाणारी फ्रान्‍समधील आयर्नमॅनची स्‍पर्धा यंदा नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी जिंकली. निर्धारित वेळेच्या(१७ तास) अगोदर म्‍हणजेच १५ तास १३ मिनिटांत डॉ. सिंगल यांनी हे अंतर पार केले.  यापूर्वी अभिनेता मिलंद सोमण आणि आयपीएस अधिकारी कृष्‍णप्रकाश हे भारतीय आयर्नमॅन बनले आहेत.

डॉ. सिंगल यांनी नियमित सराव कायम ठेवत आयर्नमॅन स्पर्धेसाठी स्वत:ला पात्र केले. या स्पर्धेत स्पर्धकांना १८० किलोमीटर अंतराची सायकलिंग, ३.८६ किलोमीटर पोहणे आणि ४२ किलोमीटर अंतर धावणे असे खडतर आव्‍हान पार करावयाचे असते. लोहपुरुषाचा मान मिळाल्‍यानंतर डॉ. सिंगल हे २ सप्टेंबरला नाशिकला परतणार आहेत.