Tue, Jul 23, 2019 07:18होमपेज › Nashik › मनपातील खातेप्रमुखांच्या जबाबदारीमध्ये खांदेपालट

मनपातील खातेप्रमुखांच्या जबाबदारीमध्ये खांदेपालट

Published On: Feb 21 2018 11:16PM | Last Updated: Feb 21 2018 11:09PMनाशिक : प्रतिनिधी

मनपातील विविध खातेप्रमुखांच्या जबाबदारीत मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी खांदेपालट केली आहे. अचानकपणे झालेल्या या बदल्यांमुळे अधिकारीही अवाक् झाले असून, बदल्यांच्या माध्यमातून आयुक्‍तांनी अनेकांना हादरे देण्याचा प्रयत्न केला आहे. मनपाच्या अंतर्गत कार्यालयीन कामकाजाच्या सोयीनुसार व कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने मनपातील उपायुक्‍त, मुख्यलेखा परीक्षक, नगरसचिव व कार्यकारी अभियंता (मलनि:स्सारण) यांच्या कामकाजात बदल कण्यात आले आहेत. त्यात उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांच्याकडे यापूर्वी प्रशासन विभाग, स्थानिक संस्था कर, समन्वय कक्ष, निवडणूक व जनगणना, हॉकर्स झोन विभाग व आपले सरकार याचा कारभार होता.

आता हा कार्यभार काढून त्यांच्याकडे महिला व बालकल्याण विभाग, अपंग कल्याण विभाग, कामगार कल्याण विभाग, निवडणूक व जनगणना, ग्रंथालय व वृत्तपत्र, माहिती अधिकार यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपायुक्‍त रोहिदास दोरकुळकर यांच्याकडे गोदावरी संवर्धन कक्ष, मूल्य निर्धारण व कर संकलन, विविध कर विभाग, लोकशाही दिन, माहिती अधिकार, महिला व बालकल्याण, कामगार कल्याण विभाग, ग्रंथालय व वृत्तपत्र विभागाचे कामकाज होते. आता त्यांच्याकडील मूल्य निर्धारण कर व संकलन विभाग, विविध कर विभाग हे कायम ठेवत स्थानिक संस्था कर विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

उपायुक्‍त रोहिदास बहिरम यंच्याकडे झोपडपट्टी सुधारणा, पीएमएसवाय, अतिक्रमण विभाग, क्रीडा विभाग, छपाई विभाग ही जबाबदारी कायम ठेवून हॉकर्स झोन विभागाचा अतिरिक्‍त कार्यभार देण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता संजय घुगे यांच्याकडे  मलनि:स्सारण विभाग कायम ठेवून गोदावरी संवर्धन कक्षाचा अतिरिक्‍त कार्यभार देण्यात आला आहे. त्याचबरोबर नगरसचिव आर. आर. गोसावी यांनी नगरसचिव, सुरक्षा, जनसंपर्क, आधारकार्ड, एनयुएलएम, मध्यवर्ती भांडार विभाग, नोंदणी बटवडा व विधी विभागाची जबाबदारी सांभाळून आता समन्वय कक्षाचा अतिरिक्‍त कार्यभार सांभाळायचा आहे.