Tue, Jul 23, 2019 04:03होमपेज › Nashik › नाशिक-मुंबई, पुणे विमान फुल्ल

नाशिक-मुंबई, पुणे विमान फुल्ल

Published On: Dec 16 2017 1:46AM | Last Updated: Dec 15 2017 11:58PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

एअर डेक्कनच्या नाशिक-मुंबई तसेच नाशिक-पुणे विमानसेवेच्या तिकीट बुकिंगला शुक्रवारी (दि.15) सकाळी प्रारंभ झाला. अवघ्या काही तासांतच नाशिककरांनी त्याला भरघोस प्रतिसाद दिला असून, 2 जानेवारीपर्यंतचे दोन्ही मार्गांवरील बुकिंग हाउसफुल्ल झाले आहे.

नाशिकहून एअर डेक्कनने दि. 23 तारखेपासून मुंबई आणि पुण्याच्या विमानसेवेचे वेळापत्रक घोषित केले. नाशिक ते मुंबई प्रवासाचे तिकीट दर 1500 तर पुण्यासाठी हेच दर 1670 रुपये आहे. दरम्यान, 30 आणि 31 डिसेंबरची तिकिटे उपलब्ध असून, 2 तारखेपर्यंत इतर दिवसांचे मात्र, दोन्ही बाजूचे बुकिंग हाउसफुल्ल झाले आहे. कंपनीने गुरुवारपासून (दि. 14) ऑनलाइन तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली होती. अवघ्या काही तासांत मुंबई आणि पुण्यासाठीची 2 जानेवारीपर्यंतच्या तिकिटांचे बुकिंग नाशिककरांनी केले. विशेष सवलतीच्या दरात तिकीट बुकिंगसाठी प्रमो कोड तिकीट बुकिंगच्या खिडकीत ऑनलाइन नोंदवून प्रवाशांना त्याचा फायदा घेता येणार आहे.