Tue, Nov 20, 2018 21:09होमपेज › Nashik › मुंबई विमानसेवेचे वेळापत्रक मार्चमध्ये बदलणार

मुंबई विमानसेवेचे वेळापत्रक मार्चमध्ये बदलणार

Published On: Feb 05 2018 2:01AM | Last Updated: Feb 05 2018 12:37AMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक-मुंबई विमानाचे सध्याचे वेळापत्रक 28 फेब्रुवारीपर्यंत कायम ठेवण्यात आले आहे. सप्ताहातील तीन दिवस सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी तर तीन दिवस दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी विमान मुंबईसाठी टेकऑफ घेईल. दरम्यान, गत दोन दिवसांत या सेवेला चांगला प्रतिसाद लाभला असून, सर्व तिकिटांची विक्री झाली. तथापि, हे वेळापत्रक मार्चमध्ये बदलण्याची शक्यता आहे. मुंबई विमानतळावर सकाळच्या सत्रात स्लॉट उपलब्ध होत नसल्याने गेल्या महिनाभरापासून नाशिक-मुंबई विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सप्ताहातील सोमवार वगळता इतर दिवशी ही सेवा अविरत सुरू आहे.

मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये विमानाचे वेळापत्रक बघता या सेवेकडे नाशिककरांनी काहीशी पाठ फिरवली होती. मात्र, गत दोन दिवसांपासून पुन्हा एकदा विमानसेवाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. विमानसेवा देणार्‍या मुंबई ते नाशिक तसेच परतीच्या प्रवासाची सर्व तिकिट विक्री झाल्याचे कंपनीच्या संकेतस्थळावर पहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये तरी मुंबई विमानतळावर नाशिकच्या विमानासाठी स्लॉट मिळण्याची आशा धुसर आहे. त्यामुळेच विमानसेवा देणार्‍या कंपनीने येत्या 28 तारखेपर्यंत  वेळापत्रक कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्याच्या वेळापत्रकानुसार मुंबईंहुन सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी विमानसेवा कायम ठेवण्यात आली आहे.