Sun, May 19, 2019 14:34
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › चांदवडला शेतकर्‍याची आत्महत्या

चांदवडला शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: Apr 11 2018 12:58AM | Last Updated: Apr 11 2018 12:38AMनाशिक : प्रतिनिधी

चांदवड तालुक्यातील मौजे शिंगवे येथील ज्ञानेश्‍वर बाबूराव मढे (44) या शेतकर्‍याने रविवारी (दि. 8) रात्री 10.30 वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यंदाच्या वर्षातील ही 25 वी आत्महत्या असून, चांदवडमधील दुसरी घटना आहे. तहसील प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार मयत मढे यांच्या नावे कोणतीही जमीन नाही. त्यांच्या वडिलांच्या नावे मौजे शिंगवे येथे गट नं. 105, 152 व 48 असे एकूण एक हेक्टर 90 आर क्षेत्र आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत 25 शेतकर्‍यांनी नैराश्येतून आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्राचे कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या निफाड तालुक्यात सर्वाधिक पाच शेतकर्‍यांनी जीवनप्रवास संपविला आहे. सिन्नर, मालेगाव व बागलाण तालुक्यांत प्रत्येकी चार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. दिंडोरी, चांदवड, येवला व देवळ्यात प्रत्येकी दोन शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाकडून एक लाखांची मदत देण्यात येते. प्रशासनाने 25 पैकी सहा आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदत मंजूर केली. नऊ प्रकरणांत तांत्रिक कारणास्तव ती नाकारण्यात आली. आजमितीस प्रशासनाकडे 10 प्रकरणे प्रलंबित आहेत.
 

 

 

tags : Nashik,news,moje, shingve,Chandwad, taluka, Farmer, Suicide, case,