Thu, Jul 16, 2020 09:49होमपेज › Nashik › मनमाडला रेल रोको

मनमाडला रेल रोको

Published On: Jan 04 2018 1:03AM | Last Updated: Jan 04 2018 12:15AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण दिवसभर बस, टॅक्सी सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने नागरीकांचे प्रचंड हाल झाले.
मनमाड रास्ता रोको, रेल रोको, पुतळादहन, व्यापारी व कार्यकर्त्यार्ंमधील बाचाबाची, व्यापार्‍यांचा पोलीस स्थानकावर मोर्चा, एसटी बंदमुळे प्रवाशांसोबत विद्यार्थ्यांचे हाल झाले. निफाड तालुक्यातील लासलगाव येथे मनमाड -लासलगाव बस (एमएच 40 एन 8616) फोडली, तसेच ती जाळण्याचा प्रयत्न केला असता, चालक व वाहकाने सतर्कता दाखवत समाजकंटकांना विरोध करत विद्यार्थी व प्रवाशांना गाडीतून खाली उतरवत त्यांचे प्राण वाचविले. सिन्नरला रास्तारोको करण्यात आला. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.