Wed, Jul 08, 2020 03:25होमपेज › Nashik › मालेगाव : तु हमारे झगडे में गीर मत म्‍हणत भोसकून शेजाऱ्याचा खून

मालेगाव : तु हमारे झगडे में गीर मत म्‍हणत भोसकून शेजाऱ्याचा खून

Last Updated: Feb 23 2020 2:53PM
मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

लहान मुलीला मारहाण करणाऱ्या शीघ्रकोपी बापाला समजविणासाठी गेलेल्‍या शेजारच्या व्यक्‍तीला छातीत चाकू भोसकून खून केल्‍याची धक्‍कादायक घटना समोर समोर आली आहे. ही घटना शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गवळीवाडा सर्वे नंबर ४५ मधील घर नंबर २६ समोर घडली.

अधिक वाचा : 'महाविकास अघाडीतील तिन्ही पक्षांना सुसंवादाची गरज'

शनिवारी रात्री शेख रफिक शेख इस्माईल उर्फ राजा हा त्याची मुलगी सनाला मारहाण करीत होता. तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारील ताहिर हुसैन अख्तर (वय ४१) व त्यांची पत्नी रखसाना यांच्यासमवेत घराबाहेर आला. ते भांडण सोडविण्यासाठीच आल्याचा समज झाल्याने रफिकने 'तु हमारे झगडे में गीर मत, तु तेरा देख' असे दरडावले. ताहिरने 'सर्वांना आरडाओरडाचा त्रास होत असल्याने भांडण करु नको, अशा शब्दात समज दिली. 

अधिक वाचा : चंद्रकांत पाटलांना माझ्यावर पीएचडी करण्यासाठी १० ते १२ वर्षे लागतील : पवार 

याचा राग आल्याने रफिक भांडणावर उतरुन शिवीगाळ करू लागला. त्यामुळे शेजारी सर्व लोक जमले. त्यांनीही समजविण्याचा प्रयत्न केला‌. यातून अधिकच खवळलेल्या रफिकने अचानक त्याच्या कमरेला लावलेला चाकू काढून ताहिरच्या छातीत खुपसला. यामुळे ताहिर जमिनीवर कोसळला. रक्तस्त्राव होऊ लागल्याने गल्लीतील रहिवाशांनी ताहीरला सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र अती रक्तस्त्रावाने त्‍याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी ताहीरची पत्नी रुखसाना हिच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयित आरोपी शेख रफिक हा फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे.