होमपेज › Nashik › ‘एमपीएससी’चे वेळापत्रक घोषित

‘एमपीएससी’चे वेळापत्रक घोषित

Published On: Jan 14 2018 2:16AM | Last Updated: Jan 14 2018 2:07AM

बुकमार्क करा




नाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) 2018 मध्ये होणार्‍या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या ुुु.ािील.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.  आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा 8 एप्रिल तर मुख्य परीक्षा 18 ते 20 ऑगस्टदरम्यान होईल. दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात जानेवारीमध्ये प्रकाशित होणार असून, पूर्व परीक्षा 6 मे रोजी होईल. दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक एक 26 ऑगस्टला, दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पोलीस उपनिरीक्षक पेपर क्रमांक दोन 2 हा सप्टेंबर रोजी होईल. दुय्यम सेवा मुख्य परीक्षा राज्य कर निरीक्षक पेपर क्रमांक दोन 30 सप्टेंबर व दुय्यम सेवा मुख्य परीक्षा सहायक कक्ष अधिकारी पेपर क्रमांक दोन हा 6 ऑक्टोबरला होणार आहे.

कृषी सेवा परीक्षेची जाहिरात फेब्रुवारीमध्ये प्रकाशित होणार असून, पूर्व परीक्षा 13 मे रोजी तर मुख्य परीक्षा 8 सप्टेंबर 2018 रोजी होईल. सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परिक्षा 20 मे रोजी तर मुख्य परीक्षा 9 नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र गट -क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात मार्चमध्ये प्रकाशित होणार असून, पूर्व परीक्षा 10 जूनला होईल. तर मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक एक 14 ऑक्टोबर रोजी होईल.  गट -क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन लिपिक टंकलेखक 21 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. गट -क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, परीक्षा 4 नोव्हेंबरला होईल. तसेच गट -क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन कर सहायक 2 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. 

वन सेवा परीक्षेची जाहिरात मार्चमध्ये प्रकाशित होणार असून, पूर्व परीक्षा 24 जून रोजी तर मुख्य परीक्षा 28 ऑक्टोबरला होईल. अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात एप्रिलमध्ये प्रकाशित होणार असून, पूर्व परीक्षा 8 जुलै रोजी होईल. यांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 17 नोव्हेंबर रोजी असून, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 24 नोव्हेंबर रोजी व स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 25 नोव्हेंबर रोजी होईल. विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा परीक्षांची मुख्य परीक्षा 15 डिसेंबर घेण्यात येईल. शिक्षण सेवा, गट-ब प्रशासन शाखा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची जाहिरात मे मध्ये प्रकाशित होणार असून, मुख्य परीक्षा 4 ऑगस्टला घेण्यात येईल. सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची जाहिरात मेमध्ये प्रकाशित होणार असून, मुख्य परीक्षा 25 ऑगस्ट रोजी होईल.