Fri, May 24, 2019 02:51होमपेज › Nashik › त्र्यंबकमध्ये आणखी एक जमीन घोटाळा

त्र्यंबकमध्ये आणखी एक जमीन घोटाळा

Published On: Mar 06 2018 2:09AM | Last Updated: Mar 06 2018 2:08AMनाशिक : प्रतिनिधी

त्र्यंबकेश्‍वरमधील शंभू दशनाम पंचायत आखाड्याची 80 गुंठे जमीन परस्परविक्री केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. कोलंबिका देवस्थानचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एक जमीन घोटाळा समोर आला आहे. या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आखाड्याने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. शंभू दशनाम पंचायत आखाड्याने सोमवारी (दि.5) जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात जमीन विक्रीची तक्रार केली आहे. आखाड्याच्या इनाम असलेल्या साडेचार हेक्टरपैकी 80 गुंठे जमिनीवरील इनाम शब्द काढत तत्कालीन तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी ती जमीन विक्री करण्याला मान्यता दिल्याची तक्रार आहे.

आखाड्याचे महंत सत्यमगिरी महाराज यांनी केलेल्या तक्रारीनुसार श्री शंभू पंचायत अटल आखाडा नागा संन्यासी आखाडा नोंदणीकृत आहे. आखाड्याच्या त्र्यंबकेश्‍वरमधील गट क्रमांक 351-1-2 या मिळकतीवर म्हाळसादेवी मंदिर, दक्षिण महादेव व जोगेश्‍वर मंदिर आहे. 
आखाड्याच्या तक्रारीनुसार, ट्रस्टच्या जागेच्या देखभालीचे काम करणार्‍या महंत दिगंबर उदयगिरी महाराज, महंत चंद्रकांतपुरी (पेगलवाडी), महंत रघुनंदपुरी हरनारायणपुरी (नागापूर), लोकेश अशोक गवळी (सातपूर ), हर्षल अविनाश शिखरे (त्र्यंबकेश्‍वर), संपत विष्णू चव्हाण, मुक्ती दवेंद्र शिंदे (गंगापूररोड, नाशिक), रामगिरी गुरू नारायणगिरी महाराज, सचिन ढेरिंगे (त्र्यंबकेश्‍वर), नीलेश देशमुख, ऋषिकेश देवकुटे, सुप्रिया देवकुटे, सतीशगिरी