Mon, Jun 17, 2019 18:32होमपेज › Nashik › नाशिकमधील सुराणा ज्वेलर्सची ‘ईडी’कडून चौकशी

नाशिकमधील सुराणा ज्वेलर्सची ‘ईडी’कडून चौकशी

Published On: Feb 21 2018 11:16PM | Last Updated: Feb 21 2018 10:56PMनाशिक : प्रतिनिधी 

हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या पीएनबी बँक घोटाळ्यानंतर ईडी व सीबीआयकडून देशातील विविध शहरांमधील नामांकित ज्वेलरी व हिरे व्यापार्‍यांच्या दालनांवर छापेसत्र सुरु आहे. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील सुराणा ज्वेलर्सच्या दालनावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी (दि.21) छापा टाकून चौकशी केल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ही चौकशी सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

सुराणा ज्वेलर्सकडे 2013 मध्ये ‘गीतांजली’ या डायमंड ब्रॅण्डची फ्रँचायजी होती. मात्र, नंतर सुराणा ज्वेलर्सने ही फ्रँचायजी सोडली होती. दरम्यान, ईडीने  फ्रँचायजी काळातील व्यवहाराची चौकशी करण्यासाठी सुराणा ज्वेलर्सवर छापे टाकल्याचे बोलले जात आहे.  शहरातील सुवर्ण अलंकार व हिरे व्यापार्‍यांची दालने रडावर असून, त्यांचीही चौकशी होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, यासंदर्भात सुराणा यांच्याशी भ्रमणध्वनीवर वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.