Wed, Mar 20, 2019 22:54होमपेज › Nashik › ‘एसीबी’कार्यालयात खडसेंची तासभर चौकशी

‘एसीबी’कार्यालयात खडसेंची तासभर चौकशी

Published On: Apr 11 2018 12:58AM | Last Updated: Apr 11 2018 12:46AMनाशिक :  प्रतिनिधी

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची चौकशी केली. मंगळवारी (दि.10) दुपारच्या सुमारास खडसे एसीबीच्या कार्यालयात आल्यानंतर त्यांची सुमारे तासभर चौकशी केल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

पुण्यातील भोसरीतील वादग्रस्त जागेसह बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली आहे. मागील वर्षी याच प्रकरणी 20 सप्टेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खडसे यांची चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी दीड ते सुमारे तीन वाजेपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.
 

 

tags :  Nashik,news,case,unaccounted, property, acb, eknath, khadse, inquiry,office,