Wed, Jan 23, 2019 09:13होमपेज › Nashik › नाशिकच्या पार्‍याने ओलांडली चाळिशी

नाशिकच्या पार्‍याने ओलांडली चाळिशी

Published On: Apr 27 2018 11:21PM | Last Updated: Apr 27 2018 11:08PMनाशिक : प्रतिनिधी

नाशिकच्या पार्‍याने पुन्हा एकदा चाळिशी ओलांडली असून, मालेगावाचा पारा शुक्रवारी (दि. 27) 44.8 अंशांवर पोहोचला. जिल्ह्यातील उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक घामाघूम झाले आहेत. चालू महिन्याच्या 5 तारखेला जिल्ह्याच्या पार्‍याने चाळिशी ओलांडली होती. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पारा 40 वर पोहोचला होता. दरम्यान, सलग दोन ते तीन दिवसानंतर पार्‍यात घट झाली होती.

गेल्या आठवड्यात पारा 36 अंशावर स्थिरावला होता. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये शुक्रवारी 40.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली.शहरात सकाळी 10 वाजेपासून उन्हाचा चटका बसत असल्याने रस्ते ओस पडले होते. शहर परिसरात उन्हाचा कडाका वाढतच चालला आहे. हंगामातील उच्चांकी 44.8 अंश सेल्सिअम तापमानाची शुक्रवारी नोंद झाली. दिवसागणिक पारा उंचावत चालल्याने मे महिन्यात 45 पार तापमान जाण्याची भिती मालेगावकरांना सतावत आहे.