Mon, Jul 22, 2019 03:15होमपेज › Nashik › चौदा कॉपीबहाद्दरांवर कारवाई

चौदा कॉपीबहाद्दरांवर कारवाई

Published On: Feb 21 2018 11:16PM | Last Updated: Feb 21 2018 11:14PMनाशिक : प्रतिनिधी

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावी परीक्षेला बुधवारी (दि. 21) प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला विभागात 14 कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. त्यांत जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक (6) विद्यार्थ्यांवर कारवाई झाली.  विद्यार्थ्यांनी सकाळी 10.30 पासूनच परीक्षा केंद्रांवर गर्दी केली होती. उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाणार असल्याने विद्यार्थी वेळेआधीच परीक्षा केंद्रांवर दाखल झाले होते.

त्यासाठी पालकांनीही नियोजन करून ठेवले होते. शहरात सकाळपासून विद्यार्थी व पालकांची लगबग दिसून येत होती. अनेक पालकांनी नोकरी-व्यवसायातून सुट्टी काढत पाल्यांसमवेत परीक्षा केंद्रांवर हजेरी लावली. हॉलतिकीट, पेनशिवाय अन्य कोणतीही वस्तू वर्गखोलीत नेण्यात बंदी होती. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य शिक्षण