Wed, Mar 20, 2019 23:00होमपेज › Nashik › नाशिक: अॅक्सिस बँकेच्या ATMमधून पैशांचा पाऊस

नाशिक: बँकेच्या ATMमधून पैशांचा पाऊस

Published On: Jun 19 2018 7:24AM | Last Updated: Jun 19 2018 7:24AMसिडको: प्रतिनिधी

एखादया योजनेत पैसे दुप्पट होतात अशा घटना घडल्या आहेत. पण नाशिकमधील सिडकोत मात्र अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून चक्क पाच पट रक्कम मिळत असल्याने नागरिकांनी रक्कम काढण्यासाठी गर्दी केली होती. यामुळे चार तासात लाखो रुपये काढले, अखेर रात्री ११ वाजता पोलिस बंदोबस्तात एटीएम बंद करण्यात आले.

सिडकोतील विजयनगर येथे अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. बँकेने चार वाजता एटीएम मध्ये पाच लाख भरले होते. या नंतर ग्राहकांनी एटीएम मधून रक्कम काढण्यास सुरुवात केली. यात एटीएम मशिन मध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने ग्राहकांना पाच पट रक्कम मिळत होती. यात एका ग्राहकाने दोन हजार काढावयास गेले असता त्याला दहा हजार रुपये आले. याची बातमी परिसरात समजताच ग्राहकांनी रक्कम काढण्यासाठी गर्दी केली. या वेळी अमोल गोलाईत हा एटीएम मधून चार हजार रुपये काढावयास आला असता त्याला वीस हजार रुपये आले.गोलाईत याने घटनेची माहिती बँकेला दिली. बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक प्रवीण भिसे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अंबड पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एटीएम बंद करण्यात आले. मात्र  या चार तासात सुमारे दोन लाख पेक्षा जास्त रक्कम ग्राहकांनी काढल्याचे निदर्शनास आले आहे.

रक्कम वसुल करणार 

एटीएम मध्ये असलेल्या सीसी टीव्ही तसेच ज्या खात्यावरून रक्कम काढण्यात आली ती माहिती घेऊन रक्कम वसुल केली जाणार आहे.- प्रवीण भिसे ,सहाय्यक व्यवस्थापक