होमपेज › Nashik › नाशिक शिक्षण मतदारसंघ निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला धक्का

नाशिक शिक्षण मतदारसंघ निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला धक्का

Published On: Jun 08 2018 2:38PM | Last Updated: Jun 08 2018 2:38PM



 नाशिक : 
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीत अर्ज छाननीच्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार अजित शांताराम लाठर यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला आहे.  वय कमी असल्याच्या कारणाने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. आगामी निवडणुकीसाठी 25 अर्ज दाखल झाले होते. त्यांच्याशिवाय अन्य 24 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.  

अर्ज छाननीवेळी उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विभागीय महसूल आयुक्त कार्यालायात गर्दी केली होती. या वेळी शिक्षक लोकशाही आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कचरे पाटील, आपा शिंदे, प्रकाश सोनावणे सुनील पंडित, आदींसह इतर उमेदवारांचे कार्यकर्ते सकाळपासूनच आयुक्त कार्यालयात उपस्थित होते. सकाळी साडेअकराला सुरु झालेली छानणी साडेबाराला आटोपली.  या अर्जांमध्ये  काँग्रेसचे अजित शांताराम लाठर यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. विधान परिषदेची उमेदवारी करण्यासाठी वय वर्ष ३० पूर्ण असावे लागते. मात्र लाठर यांचे वय २८ वर्ष असल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला.