Thu, Nov 15, 2018 09:53होमपेज › Nashik › नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुक :काँग्रेस उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुक :काँग्रेस उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद

Published On: Jun 09 2018 1:35AM | Last Updated: Jun 08 2018 11:55PMउपनगर : वार्ताहर

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत अर्ज छाननीच्या दिवशी अजित शांताराम लाठर या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज वय कमी असल्याच्या कारणाने बाद झाला. 25 उमेदवारांपैकी एकाचा अर्ज बाद होऊन 24 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.

अर्ज छाननीच्या दिवशी (दि.8) उमेदवारांनी आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात गर्दी केली होती. यावेळी शिक्षक लोकशाही आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कचरे पाटील, आप्पा शिंदे, प्रकाश सोनवणे, सुनील पंडित आदींसह इतर उमेदवारांचे कार्यकर्ते सकाळपासूनच उपस्थित होते. अर्ज छाननीला सकाळी 10.30 वाजता सुरुवात झाली. दुपारी 12.30 वा अर्ज छाननी पूर्ण झाली. या अर्जांमध्ये काँग्रेसचे अजित शांताराम लाठर यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. विधान परिषदेची उमेदवारी करण्यासाठी वय वर्षे 30 पूर्ण असावे लागते. मात्र, लाठर यांचे वय 28 वर्षे असल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला.

यांचे अर्ज ठरले वैध : अनिकेत विजय पाटील (भाजपा), भाऊसाहेब कचरे पाटील, सुनील पांडुरंग पंडित, सुनील रमेश बच्छाव, सुरेश पांडुरंग पाटील, अजित किसान दिवटे, आप्पासाहेब रामराव शिंदे, अशोक शंकर पाटील, गजानन काशीराम खराटे, किशोर भिकाजी दराडे, कुणाल नरेंद्र दराडे, दिनेश अभिमन्यू देवरे, रवींद्र भिवाजी पाटेकर, विलास शांताराम पाटील, विठ्ठल रघुनाथ पानसरे, प्रताप नारायण सोनवणे, सुनील धोंडू फरस, बाबासाहेब संभाजी गांगुर्डे, संदीप त्र्यंबक बेडसे, शालीग्राम ज्ञानदेव भिरूड, महादेव साहेबराव चव्हाण, महेश भिका शिरुडे, मुख्तार अ मो कासीम, प्रकाश हिला सोनवणे.