Tue, Jul 23, 2019 17:34होमपेज › Nashik › नाशिक : मतमोजणी  दोन दिवस चालण्याची शक्यता

नाशिक : मतमोजणी  दोन दिवस चालण्याची शक्यता

Published On: Jun 27 2018 12:18AM | Last Updated: Jun 27 2018 12:09AMसिडको : प्रतिनिधी

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतमोजणी प्रक्रिया अत्यंत किचकट असतानाच यावेळच्या निवडणुकीत  16 उमेदवार असल्याने ही प्रक्रिया आणखी  किचकट बनली आहे. यामुळे 28 जूनला मतमोजणी सुरू होऊन ती संपण्यास 29 जून उजाडणार आहे.  त्यामुळे निकाल जाहीर होण्यास दोन दिवस लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तथापि, निकाल लवकर लागण्यासाठी निवडणूक अधिकारी यात काही बदल करण्याची शक्यता आहे. 

अशी होणार मतमोजणी

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीसाठी  नाशिक, नगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण 49,742  मतदारांनी मतदान केले आहे. एकूण  20 टेबलवर मतमोजणी करण्यात येणार आहे.  या निवडणुकीसाठी नंदुरबार (16), धुळे (12),जळगाव (21), अहमदनगर (20) व नाशिक (25) अशी एकूण 94 मतदान केंद्रे आहेत.

 मतमोजणी पुढीलप्रमाणे असेल

प्रत्येक टेबलावर 25 चे सुमारे 106 किंवा 50 चे सुमारे 53 गठ्ठे मोजले जातील. 16 उमेदवार , एक (नोटा)  आणि एक अवैध मते  अशा 18 आडव्या  रकान्यांचा व 25 किंवा 50 उभ्या रकान्यांचा तक्ता प्रत्येक टेबलवर दिला जाईल. एका टेबलावर 25 चे सुमारे 106 शीट ( तक्ते) किंवा 50 चे सुमारे 53 तक्ते तयार करावे लागतील. म्हणजे 49,742   मतपत्रिकांचा  प्रथम पसंती क्रमांक निश्‍चित होऊन (नोटा) आणि बाद मतपत्रिका निश्‍चित होतील.

16 उमेदवारांना मिळालेल्या प्रथम पसंतीच्या मतांची बेरीज ही वैध मते असतील. यात 49,742 मतदान झाले आहे. त्या मतांना दोनने  भागून त्या भागाकारात एक मिळवून निवडून येण्याचा कोटा 24, 871 व त्यात 1 मिळवून 24872 मतांचा  निश्‍चित केला जाऊ शकेल. यात अवैध मतांचा समावेश केलेला नाही. परंतु, यात मते अवैध झाले ती संख्या वजा करून विजयासाठी मतदानाचा कोटा निश्‍चित केला जाऊ शकेल. मतमोजणी प्रक्रिया अत्यंत किचकट असून, उमेदवारांची संख्या 16 असल्याने ती आणखी किचकट झालेली आहे. त्यामुळे निकाल रात्री उशिरा जाहीर होईल. त्यामुळे यात बदल करून निकाल लवकर लावण्याचा निवडणूक निर्णय अधिकार्‍याचा प्रयत्न असेल.

 अशा होतील फेर्‍या 

पहिली फेरी  1 ते 16 उमेदवारांची प्रथम पसंतीची मते निश्‍चित केल्यावर कोटा ओलांडणारा  उमेदवार विजयी होऊ शकतो. परंतु 16 उमेदवार रिंगणात  असल्याने हे शक्य नाही.म्हणून मतमोजणी प्रक्रिया पुढे  चालू राहील.

पहिली फेरी : या फेरीत सर्वात कमी मते मिळालेला उमेदवार वगळला (डिलीट) जाईल व त्या उमेदवाराच्या  मतपत्रिका  काढून घेऊन , त्या मतपत्रिकेवरील दुसर्‍या क्रमांकाच्या पसंतीची मते ज्या ज्या 15 उमेदवारांना पडली असतील ती त्यांना दिली  जातील. आणि प्रगत ( प्रोग्रेसिव्ह) बेरीज केली जाईल.

दुसरी  फेरी :  पहिल्या फेरीतील प्रगत मते (डिलीट झालेल्या उमेदवारांच्या मतांच्या वाटपानंतर आलेली बेरीज) विचारात घेऊन राहिलेल्या 15 उमेदवारांत ज्याची सर्वात कमी मते असतील तो उमेदवार डिलीट करून त्याची मते स्पर्धेत उरलेल्या 14 उमेदवारांना  वाटली जातील.  मते वाटतांना डिलीट झालेल्या दोन उमेदवारांना मिळालेले पसंती क्रमांक वगळून पुढील पसंती क्रमांक (उदा. दुसरा, तिसरा )  स्पर्धेतील 14 उमेदवारांना वाटले जातील. 14 उमेदवारांची प्रगत मतांची बेरीज केली जाईल. 14 उमेदवारांमध्ये सर्वात कमी मते असणारा उमेदवार वगळून त्या उमेदवाराच्या मतपत्रिकेतील पुढील पसंतीक्रम स्पर्धेत टिकलेल्या 13 उमेदवारांना वाटून, त्या मतांची प्रगत बेरीज केली जाईल.

तिसरी फेरी : 14 उमेदवारांमध्ये सर्वात कमी मते असणारा उमेदवार वगळून त्या उमेदवाराच्या मतपत्रिकेतील पुढील पसंती क्रम स्पर्धेत टिकलेल्या 13 उमेदवारांना वाटून, त्या मतांची प्रगत बेरीज केली जाईल.

चौथी फेरी : 13 उमेदवारांमध्ये सर्वात कमी मते असणारा उमेदवार वगळून त्या उमेदवाराच्या मतपत्रिकेतील पुढील पसंतीक्रम स्पर्धेत टिकलेल्या 12 उमेदवारांना वाटून, त्या मतांची प्रगत बेरीज केली जाईल. 12 उमेदवारांमध्ये सर्वात कमी मते असणारा उमेदवार वगळून त्या उमेदवाराच्या मतपत्रिकेतील पुढील पसंतीक्रम स्पर्धेत टिकलेल्या 11 उमेदवारांना वाटून, त्या मतांची प्रगत बेरीज केली जाईल. 

पाचवी फेरी : 12 उमेदवारांमध्ये सर्वात कमी मते असणारा उमेदवार वगळून त्या उमेदवाराच्या मतपत्रिकेतील पुढील पसंती क्रम स्पर्धेत टिकलेल्या 11 उमेदवारांना वाटून, त्या मतांची प्रगत बेरीज केली जाईल

सहावी फेरी : 11 उमेदवारांमध्ये सर्वात कमी मते असणारा उमेदवार वगळून त्या उमेदवाराच्या मतपत्रिकेतील पुढील पसंतीक्रम स्पर्धेत टिकलेल्या 10 उमेदवारांना वाटून त्या मतांची प्रगत बेरीज केली जाईल.

सातवी फेरी : 10 उमेदवारांमध्ये सर्वात कमी मते असणारा उमेदवार वगळून त्या उमेदवाराच्या मतपत्रिकेतील पुढील पसंतीक्रम स्पर्धेत टिकलेल्या 9 उमेदवारांना वाटून  त्या मतांची प्रगत बेरीज केली जाईल
जोपर्यंत ठरलेला कोटा पूर्ण होत नाही. तोपर्यंत मतमोजणीची ही प्रक्रिया सतत चालू राहील. कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी घोषित करून मतमोजणी प्रक्रिया थांबविली जाईल. मात्र, 15 फेर्‍या झाल्यानंतर जरी कोटा पूर्ण झाला नाही तरी स्पर्धेत जो शेवटचा उमेदवार टिकेल तो निवडून  आल्याचे घोषित केले जाईल. त्याने कोटा पूर्ण केला नसेल तरी तो विजयी होईल.

मतपत्रिकांचे गठ्ठे

मतपत्रिकांचे गठ्ठे 25 किंवा 50 चे करू शकतात. यात  0 टेबलांवर पहिल्या फेरीत नंदुरबारची 16 केंद्रे आणि धुळ्याची चार केंद्रे  गठ्ठे तयार करण्यासाठी घेतली जातील.

20 टेबलांवर दुसर्‍या फेरीत धुळ्याची आठ केंद्रे आणि जळगावची 12 केंद्रे गठ्ठे तयार करण्यासाठी घेतली जातील.20 टेबलांवर तिसर्‍या फेरीत जळगावची नऊ केंद्रे आणि अहमदनगरची 11  केंद्रे गठ्ठे तयार करण्यासाठी घेतली जातील. 20 टेबलांवर चौथ्या फेरीत नगरची नऊ केंद्रे आणि नाशिकची 11 केंद्रे गठ्ठे तयार करण्यासाठी घेतली जातील. पहिल्या 14 टेबलांवर पाचव्या फेरीत नाशिकची 14 केंद्रे गठ्ठे तयार करण्यासाठी घेतली जातील. यात कोणत्याही जिल्ह्याचे केंद्र मतमोजणीसाठी घेऊ शकतात.