Wed, May 22, 2019 20:17होमपेज › Nashik › नाशिक -जयपूर विमानसेवेची मागणी 

नाशिक -जयपूर विमानसेवेची मागणी 

Published On: Feb 25 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 11:44PMनाशिक : प्रतिनिधी 

देशांतर्गत व महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी नाशिक-जयपूरसाठी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी चौधरी यात्रा कंपनीचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी नुकत्याच नाशिक दौर्‍यावर आलेल्या लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्रातून पर्यटनाला जाणार्‍या प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याद‍ृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधांची वानवा आहे. त्यासाठी केंद्र शासनाने काही सुविधा उपलब्ध केल्यास राजस्थान व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांतील पर्यटनास चालना मिळेल. त्यातून व्यापार विनिमय तसेच रोजगाराला चालना मिळेल. नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ तसेच लँडिंग सुविधा उपलब्ध आहे. त्याला चालना देण्यासाठी विमानसेवेचा विस्तार आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या उडान योजनेत त्याचा समावेश करावा, असे निवेदन दिले तसेच त्यांच्याशी त्र्यंबकेश्‍वर येथे  चर्चा केली. याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करण्याचे  आश्‍वासन श्रीमती महाजन यांनी चौधरी यांना दिले.

उडान योजनेतंर्गत नाशिकहून मुंबई आणि पुणे विमान योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहेत.दूसर्‍या टप्प्यात नाशिकहून इतर शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू होत आहे.यापार्श्‍वभूमीवर नाशिक -जयपुर विमानसेवा सुरू करण्याची मागणी चौधरी यांनी केली आहे.