Fri, Oct 18, 2019 22:52होमपेज › Nashik › नाशिक : दीपनगरातील कंत्राटदार गोळीबारातून बचावला

नाशिक : दीपनगरातील कंत्राटदार गोळीबारातून बचावला

Last Updated: Oct 10 2019 5:01PM

संग्रहित छायाचित्रजळगाव : प्रतिनिधी

भुसावळ  तालुक्यातील दीपनगरातील अ‍ॅश ट्रान्सपोर्टर व्यावसायिकावर त्याच व्यवसायातील कंत्राटदाराने गावठी कट्टा रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये झालेल्या झटापटीत गोळी न चालल्याने कंत्राटदार मुकेश शैलेंद्र तिवारी हे बचावले. या घटनेने दीपनगरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली. गुरुवारी सकाळी 10.15च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर ट्रान्सपोर्टर दीपक मधुकर हतोले (38) यांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गुन्हेगारी रोखण्यात पोलिस प्रशासन अपयशी

भुसावळात पाच दिवसांपूर्वीच पूर्व वैमनस्यातून खरात कुटुंबीयातील चार सदस्यांसह अन्य एकाची गोळी तसेच चाकू व दगड मारून हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच गेल्या 48 तासात शहर व बाजारपेठ पोलिसानी दोन गावठी कट्ट्यांसह दोन जिवंत काडतुसे तसेच दोन आरोपींना अटक केली होती. ही घटना विस्मरणात जात नाही तोच पुन्हा दीपनगरातील ठेकेदारावर कट्टा रोखण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भुसावळातील पोलिस प्रशासन गुन्हेगारी रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याची उघड टिका जनतेतून होत आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी धडक मोहिम राबवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पोलिस दलाची धाव

दीपनगर वसाहतीत ठेकेदारावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड तसेच तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह पोलिसांनी धाव घेत माहिती जाणून घेतली. श्‍वान पथकासह ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.