Mon, Mar 18, 2019 19:20



होमपेज › Nashik › पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नगररचनाविषयी तक्रार करणार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नगररचनाविषयी तक्रार करणार 

Published On: Jan 16 2018 2:14AM | Last Updated: Jan 16 2018 1:32AM

बुकमार्क करा




नाशिक : प्रतिनिधी

नगररचना विभागासाठी तयार करण्यात आलेल्या ऑटो डीसीआर प्रणालीसंदर्भात येत्या गुरूवारी (दि.18) मनपात संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक बोलविण्यात आली आहे. दरम्यान, या प्रणालीत सुधारणा करण्याबाबत तत्काळ कार्यवाही न झाल्यास हाती आलेल्या पुराव्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्याची धमकी पश्‍चिम प्रभागाच्या सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी मनपा प्रशासनाला दिली आहे. गेल्या आठवड्यातच मनपाने नगररचना विभागातील अधिकार्‍यांसह शहरातील बिल्डर व वास्तूविशारद तसेच प्रणाली तयार केलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यात प्रणालीतील त्रृटी दूर करण्याबाबत कंपनीला आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून, कोणत्याही स्थितीत या प्रणालीद्वारे ऑनलाईन प्रस्ताव स्विकारण्याचे काम थांबविले जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती आयुक्तांनी केली आहे.

यासंदर्भात पश्‍चिम प्रभागाच्या सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी आयुक्तांना निवेदन सादर केल असून, त्यात त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. ऑटो डीसीआर पध्दत राबविण्याचा हेतू चांगला असला तरी सध्या यासंदर्भात सुरू असलेला प्रकार चुकीचा असल्यामुळे रोगापेक्षा इलाजच भयंकर अशी स्थिती नगररचना विभागात निर्माण झाल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. अनेक बाबी या डीसी रुल्स सॉप्टवेअरमध्ये व्यवस्थित समाविष्ट झालेल्या नाहीत. त्यामुळे ऑनलाईन अ‍ॅक्सेप्टन्स ला खूप अडचणी निर्माण होत आहे. यामुळे कालापव्यय होत असून, याबाबत डॉ. पाटील यांनी अनेक उदाहारणे निवेदनात दिली आहे.

नगररचना विभागात वास्तुविशारदांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. गैरप्रकार व गैरव्यवहार रोखणे हा उद्देशही या सॉप्टवेअरमुळे यशस्वी होऊ शकलेला नाही. यामुळे या यंत्रणेत तातडीने बदल करणे आवश्यक आहे. संबंधित सॉप्टवेअर कंपनीसोबत आर्किटेक्ट, इंजिनिअर या सर्वांचे एक पॅनल बनवून या त्रृटी दूर करणे शक्य आहे. तसेच कंपनीमार्फत नगररचना विभागातील अभियंते व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याची मागणी त्यांनी  केली आहे.