Wed, Nov 13, 2019 12:40होमपेज › Nashik › ग्रामीण-शहरी भागातील असमतोल धोकादायक : पोपटराव पवार 

ग्रामीण-शहरी भागातील असमतोल धोकादायक : पोपटराव पवार 

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 22 2018 11:15PMनाशिक: प्रतिनिधी

स्वांतत्र्यप्राप्तीपासून ते आजपर्यंत पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, वीज या सारख्या पायाभूत सुविधाभोवती देशाची व्यवस्था फिरत आहे, शेती विकासासाठी राबविलेली कृषी विस्ताराची कार्य सध्या निरूपयोगी ठरत असल्याने ग्रामीण भागातील जीवनमान अधिकच बिकट होत चालले आहे. येत्या काळात शहरी आणि ग्रामीण विकासातील ही दरी कमी केली नाही, तर देशाला उध्दवस्त करण्यासाठी कुठल्याही परकीय शक्तीची गरज भासणार नाही असा इशारा आदर्श ग्राव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या दिला आहे. रोटरी कल्ब ऑफ नाशिकतर्फे दिला जाणार्‍या ‘नाशिक भूषण पुरस्कार’ वितरण प्रसंगी रावसाहेब थोरात सभागृहात ते बोलत होते. सह्याद्री फार्मर्स प्राड्युसर्सचे संचालक तथा प्रगतशील शेतकरी विलास शिंदे यांना हा पुरस्कार प्रदाण करण्यात आला. व्यासपीठावर माजीमंत्री विनायकदादा पाटील, रोटरी क्‍लबचे अध्यक्ष दिलीप सिंह बेनिवाल, श्रीनंदन भालेराव, मनीष चिंधडे आदी उपस्थित होते.

पोपटराव पवार म्हणाले, गेल्या 70 वर्षांत विकासाच्या नावाखाली निसर्गाशी प्रचंड दुरावा निर्माण झाला आहे. शहरीकरणाच्या नादात ग्रामीण भागाकडे विशेषता: कृषी विकासात आवश्यक प्रगती झाली नाही. त्यामुळे ग्रामीण अर्थ व्यवस्था खिळखिळी झाली आहे. 

आजही शेतकर्‍यांची बियानांमध्ये फसवणूक होते. पीक नियोजन, भूजल व्यवस्थापन, पाण्याचे पुनर्रभरण, शेती पिकांचे विक्री व्यवस्थापन आदी बाबतीत मोठ्या प्रमाणावर काम करावे लागणार आहे. त्यातूचनच ग्रामीण अर्थ व्यवस्था बळकट होऊ शकते असे ते म्हणाले. तसेच विलास शिंदे यांनी कृषी क्षेत्रात केलेले कार्य देशासाठी पथदर्शी असून नाशिकने देशाच्या कृषी क्षेत्राला दिशा देण्याचे काम करावे असे अवाहन त्यांनी केले.

विनायकदादा पाटील यांनी शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज असून उच्च शिक्षित तरूणांनी कृषी क्षेत्रात नवनवीन संशोधन, प्रयोग करून या क्षेत्राला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे गरज असल्याचे सांगितले. तसेच रोटरीतर्फे कृषी क्षेत्राच्या सन्मानाबद्दल रोटरी कल्बचे अभिनंदन केले. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते  प्रगतशील शेतकरी विलास शिंदे ‘नाशिक भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रस्ताविक रोटरीचे अध्यक्ष दिलीप सिंह बेनी यांनी केले. सुत्रसंचालन स्वाती मराठे यांनी केले.