होमपेज › Nashik › नाशिक : ३१ डिसेंबर; मद्यपिंसाठी खुशखबर...

नाशिक : ३१ डिसेंबर; मद्यपिंसाठी खुशखबर...

Published On: Dec 22 2017 8:01PM | Last Updated: Dec 22 2017 8:01PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

नववर्षाच्या स्वागतासाठी आतुर झालेल्या मद्य शौकिनांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. याला कारण म्हणजे नाताळातील २४ व २५ डिसेंबर या दिवशी तसेच थर्टीफस्ट म्हणजेच ३१ डिसेंबर अशा तीन दिवसांसाठी मद्यविक्रीची दुकाने पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे मद्य विक्रेते तसेच मद्य शौकिनांनामध्ये आनंदाचे वातावरण असून, थर्टी फस्टचे वेध लागले आहेत.

सकाळी साडेअकरा वाजता दुकाने उघडल्यानंतर दुसर्‍या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत परमीट रूम व बिअर बार उघडे ठेवता येणार आहेत. जे यापुर्वी रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू ठेवता येत होते. तर वाईन शॉपी, बिअर शॉपी, देशी दारू विक्रीची दुकाने रात्री दहा ते साडेदहा वाजेपर्यंत सुरु ठेवता येत होती. ती आता पहाटे १ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे मद्य शौकिनांमध्ये  आनंदाचे वातावरण आहे.