Wed, May 22, 2019 07:11होमपेज › Nashik › भुजबळांमुळे मी आमदार; सेनेच्या विजयी उमेदवाराचा गौप्यस्फोट

भुजबळांमुळे मी आमदार; सेनेच्या विजयी उमेदवाराचा गौप्यस्फोट

Published On: May 24 2018 12:58PM | Last Updated: May 24 2018 12:58PMनाशिक : पुढारी ऑनलाईन

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा राष्ट्रवादीकडून आपल्या ताब्यात घेण्यात शिवसेनेने यश मिळवले. शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी राष्ट्रवादीच्या सहाणे यांच्यावर १९३ मतांनी विजय मिळवला. विजयानंतर दराडे यांनी छगन भुजबळांच्या मदतीमुळे मी आमदार झाल्याचा गौप्यस्फोट केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

गेल्या २४ वर्षांपासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीने ताब्यात ठेवला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार डॉ. सहारे यांना कडवी लढत देत या मतदारसंघात शिवसेनेच्या दराडे यांनी बाजी मारली. दराडे यांनी विजयानंतर आमदार होण्यासाठी भुजबळांनी मदत केल्याचे म्हटले आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भेट घेतली होती.