Thu, Jul 18, 2019 22:03होमपेज › Nashik › नामपूरला युवकाचा खून; बाजार समिती सभापतीस अटक

नामपूरला युवकाचा खून; बाजार समिती सभापतीस अटक

Published On: Jan 26 2018 1:17AM | Last Updated: Jan 25 2018 11:28PMनामपूर : वार्ताहर

येथील वारीस मुख़्तार शेख (32) याचा बुधवारी (दि.24) रात्री खून झाला. या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीवरून नामपूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब राजाराम कापडणीस, किशोर देवराम कापडणीस यांना अटक करण्यात आली आहे. अन्य एक जण फरार आहे. यामुळे नामपूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताहाराबाद रोडवरील द्याने फाटा परिसरातील  पीर बाबा टेकड़ीजवळ वारिसचा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती पोलिसपाटील बाजीराव सावंत यांनी जायखेड़ा ठाण्यात दिली. निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, उपनिरीक्षक श्रीराम कोळी यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह हा नामपूर ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. घटनेची खबर पसरल्याने मृताचे नातेवाईक व ग्रामस्थांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.  त्यानंतर घटनेच्या निषेधार्थ केलेल्या रास्ता रोकोत सर्व पक्षीय नेते व समाज बांधव सहभागी झाले होते. पोलिसपाटील बाजीराव सावंत, सरपंच कविता सावंत, प्रवीण सावंत, अशोक सावंत, किरण अहिरे, समीर सावंत यांनी मृताच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.