Sun, Apr 21, 2019 05:47होमपेज › Nashik › जळगाव विद्यापीठाचे ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी’ नामकरण

जळगाव विद्यापीठाचे ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी’ नामकरण

Published On: Aug 13 2018 1:21AM | Last Updated: Aug 12 2018 11:32PMजळगाव : प्रतिनिधी

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार हा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा शनिवार (दि.11)पासून झाला असल्याची घोषणा कुलगुरु प्रा.पी.पी. पाटील यांनी विद्यापीठात झालेल्या बैठकीत केली. शुक्रवारी नामविस्ताराबाबतचे राज्य शासनाचे राजपत्र विद्यापीठाला प्राप्त झाले. त्यामध्ये 11 ऑगस्टपासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा नामविस्तार होत असल्याचे सूचित करण्यात आले. 

त्या अनुषंगाने शनिवारी सिनेट सभागृहात विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचाज्यांची बौठक कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी कुलगुरूंनी हा दिवस विद्यापीठाच्या द‍ृष्टिकोनातून अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा असून, खान्देशातील एका शेतकर्‍याच्या कुटुंबात जन्मलेल्या आणि अक्षरओळख नसलेल्या बहिणाबाईचे नाव उच्चशिक्षण देणार्‍या विद्यापीठाला देणे या यासारखी अभूतपूर्व घटना कोणतीच नाही, असे म्हटले.