Wed, Jul 24, 2019 12:09होमपेज › Nashik › तिहेरी तलाक : महिलांचा मोर्चा

तिहेरी तलाक : महिलांचा मोर्चा

Published On: Mar 19 2018 1:48AM | Last Updated: Mar 18 2018 11:36PMमनमाड : वार्ताहर

केंद्र शासनाने ट्रिपल तलाकबाबत संसदेत मंजूर केलेले विधेयक हे मुस्लिम महिलांवर अन्याय करणारे असून, हे विधेयक तातडीने मागे घेण्यात यावे. या मागणीसाठी शनिवारी मनमाड शहरात मुस्लिम महिलांच्या वतीने विराट मोर्चा काढून मंडल अधिकारी कैलास चौधरी, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना निवेदन देण्यात आले.

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चाचे संयोजन शहरातील मुस्लिम समाजातर्फे करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मनमाड शहरात प्रथमच मुस्लिम महिलांनी मोर्चा काढला होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला.