Sat, Feb 16, 2019 11:35होमपेज › Nashik › तांत्रिक कारणास्तव व्यत्यय; पुण्यासाठी मात्र टेकऑफ

मुंबईचे विमान दुसर्‍या दिवशी जमिनीवरच!

Published On: Dec 25 2017 1:19AM | Last Updated: Dec 24 2017 11:31PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

उड्डान योजनेत दुसर्‍याच दिवशी मुंबईच्या विमानाला तांत्रिक कारणामुळे खो मिळाला. मात्र, सायंकाळच्या सुमारास पुण्यासाठीचे विमानाचे टेकऑफ वेळेत झाले. दरम्यान, वेळापत्रकानुसार सोमवारी कोणतीच सेवेचे नियोजन नसल्याने आता मंगळवारीच पुढील विमान नाशिकमधून उड्डाण घेईल.

ओझर विमानतळावरून सुरू झालेल्या विमानसेवेअंतर्गत वेळापत्रकानुसार रविवारी सकाळी 6.20 मिनिटांनी मुंबईसाठी विमानाचे टेकऑफ घेऊन 7 वाजून 10 मिनिटांनी मुंबईत पोहचणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक कारण देत एअर डेक्कनने ही सेवा रद्द केली. त्यामुळे मुंबईच्या विमानसेवेला दुसर्‍याच दिवशी खो मिळाला. दरम्यान, मुंबईचे विमान रद्द झाले तरी सायंकाळी पुण्यासाठी मात्र, विमानाचे वेळेत म्हणजेच 6 वाजून 20 मिनिटांनी उड्डाण झाले. विशेष म्हणजे पुण्यासाठीचे बुकिंग हाऊसफुल्ल होतेे. 

शनिवारी (दि. 23) मोठ्या थाटात पुण्यासाठी विमानसेवा सुरू झाली. परंतु, पहिल्याच दिवशी उद्घाटन सोहळ्यामुळे या सेवेला दोन तास विलंब झाला. दरम्यान, या सोहळ्याप्रसंगी एअर डेक्कनचे अध्यक्ष गोपीनाथ यांनी मुंबई विमानतळावर रिजनल कनेक्टिव्हीटीअंतर्गत अनेक तांत्रिक समस्या असल्याचे सांगितले होते. त्यामुळे अनेक राज्यातील अनेक शहरांमधून सेवा सुरू करताना अडचणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. 

मुंबई विमानतळावर 25 टक्के रिजनल सेवेसाठी वेळ राखीव ठेवण्याची मागणी केली होती. ऊड्डान योेजनेअंतर्गत मंगळवार ते रविवार अशी मुंबई आणि पुण्यासाठी सेवांचे वेळापत्रक करण्यात आले आहे. त्यामुळेच यापुढील विमान आता मंगळवारी सकाळी मुंबईसाठी टेकऑफ घेईल.