Sat, Feb 16, 2019 19:46होमपेज › Nashik › मुंबई, पुण्यासाठी विमानसेवा सुरळीत

मुंबई, पुण्यासाठी विमानसेवा सुरळीत

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 28 2017 11:28PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

मुंबई विमानतळावर लॅन्डिंगसाठी दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी स्लॉट उपलब्ध झाल्याने नाशिकहून मुंबईसाठीची विमानसेवा सुरळीत सुरू झाली आहे. दुसरीकडे सायंकाळी मात्र, पुण्यासाठी वेळेत उड्डाण होत आहे. दरम्यान, नवीन वर्षात मुंबई विमानतळावर सकाळी 7 वाजता स्लॉट मिळणार असल्याचे एअर डेक्कनतर्फे सांगण्यात आले. 

उडान योजने अंतर्गत गत आठवड्यामध्ये नाशिकमधून मुंबई आणि पुण्यासाठी एअर डेक्कनने विमानसेवा सुरू केली. मात्र, शुभारंभाच्या दुसर्‍याच दिवशी मुंबईचे विमान तांत्रिक कारणास्तव रद्द करण्याची वेळ कंपनीवर आली होती. त्यानंतरही या सेवेबाबत अनिश्‍चितता होती. मात्र, पुण्यासाठीचे विमान सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी नियमितपणे सुरू आहे. 

नाशिकहून उड्डाण केलेल्या विमानाला मुंबई विमानतळावर सकाळच्या सुमारास स्लॉट मिळत नसल्याने या सेवेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. कंपनीने सध्या दुपारी 11 वाजून 55 मिनिटांनी मुंबईसाठी सेवा दिली जात आहे. दरम्यान, सकाळच्या सुमारास 7 वाजेला लॅन्डिंगसाठी स्लॉट मिळावा यासाठी मुंबई विमानतळावरील जीव्हीके कंपनीसोबत एअर डेक्कनची चर्चा सुरू आहे. त्यात लवकरच यश मिळण्याची आशा असून, 1 जानेवारीपासून नियमित सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी ही सेवा सुरू होईल, असे एअर डेक्कनतर्फे सांगण्यात आले.