Sat, Mar 23, 2019 18:08होमपेज › Nashik › समृद्धी मार्गाची मोजणी करणाऱ्यांना शेतकऱ्यांनी लावले पळवून

समृद्धी मार्गाची मोजणी करणाऱ्यांना शेतकऱ्यांनी लावले पळवून    

Published On: Mar 25 2018 5:08PM | Last Updated: Mar 25 2018 5:08PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना शिवडेकरांनी रविवारी हुसकावून लावले. समृद्धी मार्गाबद्दल शेतकऱ्यांना असणारा विरोध पुन्हा एकदा दिसून आला. संतप्त ग्रामस्थांनी मोजणी साहित्य ताब्यात घेत कर्मचाऱ्यांच्या काम करु देणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

एकीकडे प्रशासन शिवडेकर समृद्धी महामार्गासाठी शेतकरी जमीन देण्यासाठी तयार असल्याचा दावा करत आहे. पण प्रत्येक्षात  शिवडेतील शेतकरी अद्यापही विरोधावर ठाम असल्याचे चित्र आहे.  रविवारी मोजणीसाठी आलेल्या एल अँड टी कंपनीच्या आठ कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी हिसका दाखवत हुसकावून लावले. त्यांनी मोजणी साहित्यही जप्त केले. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या मोजणीचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.

 

Tags : Mumbai,  Nagpur,  Samruddhi Mahamarg,  Shivade,  Farmer,  Samruddhi Project