होमपेज › Nashik › मल्टिप्लेक्सला  खळ्ळखट्याकचा इशारा

मल्टिप्लेक्सला  खळ्ळखट्याकचा इशारा

Published On: Jul 04 2018 2:17AM | Last Updated: Jul 03 2018 11:02PMनाशिक : प्रतिनिधी         

नाशिक - पुणे महामार्गावरील आयनॉक्स मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाने खाद्यपदार्थांचे अव्वाच्या सव्वा दर  कमी न केल्यास खळ्ळखट्याक स्टाइलने आंदोलन केले जाईल, अशा इशारा मनसेने दिला आहे. खाद्यपदार्थांचे बाजारभावाप्रमाणे दर लागू करून प्रेक्षकांची लूट थांबवावी. या मागणीचे निवेदन आयनॉक्स मल्टिप्लेक्सचे व्यवस्थापकांना देण्यात आले.

मल्टिप्लेक्समध्ये समोसा, पॉपकॉर्न, शीतपेये व इतर खाद्यपदार्थ हे बाजारभावापेक्षा अवाच्या सव्वा दराने प्रेक्षकांना विकले जातात. तसेच, बाहेरील खाद्यपदार्थ सुरक्षेचे कारण पुढे करून  चित्रपटगृहात नेण्यास परवानगी दिली जात नाही. सामान्य नागरिक हे मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहण्यास गेल्यावर त्यांना तिकीटाचे दर परवडत नाही. मल्टिप्लेक्समध्ये साधी पाण्याची बॉटल सुद्धा दामदुपटीने विकली जाते.जर तिकीट दारात सर्व्हिस टॅक्स प्रेक्षकांकडून आकारला जातो. पाणी ही अत्यावश्यक सेवा असल्याने पाण्याची मोफत व्यवस्था केली जात नाही.

हा सर्व मनमानी कारभार असून, मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाने बाजारभावाप्रमाणे खाद्यपदार्थांची विक्री करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दर कमी न केल्यास मनसे स्टाइल आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी मनसे कामगार सेना प्रदेश चिटणीस तथा मध्य नाशिक विभाग अध्यक्ष अंकुश पवार, नाशिकरोड विभाग अध्यक्ष प्रकाश कोरडे, शहर उपाध्यक्ष नितीन साळवे , जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले ,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश घुगे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सिडको : त्रिमूर्ती चौकातील कार्निव्हल मल्टिप्लेक्सच्या व्यवस्थापकांना  मनसेच्या सिडको विभागाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी मल्टिप्लेक्समध्ये अव्वाच्यासव्वा दराने  विकल ेजाणारे खाद्यपदार्थ हे बाजार भावाप्रमाणेच विक्री करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला. यावेळी विभाग अध्यक्ष रामदास  दातीर, शहर सरचिटणीस अ‍ॅड. अतुल सानप, विजय आगळे, शहर संघटक नितीन माळी, अर्जुन वेताळ, राजू परदेशी, अंबादास आहेर, संजय दातीर, बाजीराव दातीर, हेमंत आहेर, अरुण दातीर, गणेश मोरे, संदेश जगताप, तुषार भंदुरे, सागर निगळ, अक्षय कोबडे, बबलू ठाकूर, गोपाल हरकल, विशाल फडोळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.