Tue, Nov 20, 2018 22:14होमपेज › Nashik › अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Published On: Mar 17 2018 1:14AM | Last Updated: Mar 17 2018 12:17AMधुळे : प्रतिनिधी

दोंडाईचा येथे बालिकेवरील अत्याचाराचे प्रकरण गाजत असतानाच धुळ्यात पुन्हा अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपी हा नगरसेविकेचा मुलगा असून, त्याला धुळे शहर पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.

शहरातील वैभवनगर येथील पीडिता याच भागात एका खासगी क्लाससाठी गेली होती. यावेळी रस्त्यात एका अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या महिलेने पीडितेला तुझ्या आईचे आरडीचे कागदपत्रे घेऊन जाण्यासाठी घरी ये सांगितले होते. ते घेण्यासाठी ती गेली असता घरात संशयित स्वप्निल परदेशी हा घरात होता. यावेळी त्याने मुलीचा विनयभंग केला. पीडितेने याबाबत घरी सांगितल्यानंतर परिवाराने याबाबत गुन्हा दाखल केला आहे.