होमपेज › Nashik › ‘सीईटी’साठी विद्यार्थ्यांकडून मोबाइल अ‍ॅप

‘सीईटी’साठी विद्यार्थ्यांकडून मोबाइल अ‍ॅप

Published On: May 01 2018 1:17AM | Last Updated: May 01 2018 12:28AMचांदवड : वार्ताहर

येथील नॅक मानांकित ‘अ’ दर्जाचे एस. एन. जे. बी संचलीत कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाने बारावी विज्ञान शाखेतून सीईटी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या सरावासाठी एक मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपद्वारे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स व बायोलॉजी या विषयांचे बहुपर्यायी सराव प्रश्‍न असणार आहे. अभ्यास करताना विद्यार्थ्यांना सोयीस्कर जाणार आहे.

यातील प्रश्‍नपत्रिका डीटीईच्या वेळेसंबंधीच्या निकषानुसार विद्यार्थ्यांना सोडविता येणार आहे. परीक्षा दिल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना परीक्षेचे गुण समजणार आहे. तसेच या अ‍ॅपमध्ये शासनाद्वारे परीक्षेसंबंधीच्या वेळोवेळी येणार्‍या सूचनाही विद्यार्थ्यांना कळणार आहे. हे अ‍ॅप तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने बनविण्यात आले आहे. हे अ‍ॅप विद्यार्थ्यांना  http://www.snjb.org/engineering/up-images/downloads/SNJB-0305201%.apk या लिंकवर डाउनलोड करता येणार आहे.

या मोबाइल अ‍ॅपचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष अजित सुराणा, महाविद्यालयाचे समन्वयक दिनेश लोढा, झुंबरलाल भंडारी, सुनील चोपडा, प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे यांनी केले आहे.