Wed, Jul 17, 2019 18:30होमपेज › Nashik › नाशिक : मनपाचे बेपत्ता अभियंता पाटील घरी परतले

नाशिक : मनपाचे बेपत्ता अभियंता पाटील घरी परतले

Published On: Jun 01 2018 9:32AM | Last Updated: Jun 01 2018 9:36AMनाशिक : प्रतिनिधी

कामकाजाच्या तणावामुळे शनिवार (दि.२६) पासून बेपत्ता असलेले नाशिक महापालिकेतील नगररचना विभागाचे सहायक अभियंता रवींद्र पाटील हे आज (दि.१ जून) घरी परतले. पुणे शहरातिल स्वारगेट परिसरातून त्यांनी कुटुंबियाना फोन केला व त्यांनंतर ते घरी आले. 

गेल्या शनिवारी पाटीलल बेपत्ता झाले होते. त्यांच्या कारमधे एक चिट्ठी सापडली होती. ‘माझा शोध घेऊ नये, कामकाजाचा ताण वाढला आहे.’ असा मजकूर पाटील यानी चिट्ठित लिहला होता. तसेच त्यांचा मोबाइल देखील घरात असल्याने शोध घेणे अवघड झाले होते. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यात 3 पथक पाठवली होती. 

दरम्यान, पाटील यांचा ईमेल पुण्यातून वापरल्याचे समजताच गंगापूर पोलिसांचे एक पथक पुणे येथे गेले होते. तेथील शनिवार वाडा परिसरातून ईमेल वापरल्याने पोलिसांनी शहर पिंजूंन काढले होते. दरम्यान पाटील यांनी कुटुंबियांशी संपर्क साधला आणि पुण्यात असल्याचे कळवले. त्यानंतर कुटुंबियानी पुण्याला जाऊन पाटील यांना स्वारगेट परिसरातून घरी आणले.

मानसिक ताण तणाव मूळे बाहेर गेलो होतो. अजून मनस्थिती चांगली नाही, त्यामुळे अधिक बोलणार नाही. घरी परतल्याने आनंद झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. लवकरच कामावर रुजू होणार असू याबाबात महापौर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे रवींद्र पाटील यांनी सांगितले