Fri, Jul 19, 2019 22:36होमपेज › Nashik › नाशिकमधील कान्हेरेवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

नाशिकमधील कान्हेरेवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

Published On: May 21 2018 7:26PM | Last Updated: May 21 2018 7:26PMनाशिक : 

नाशिक जिल्ह्यातील कान्हेरेवाडी येथे एका 16 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी रात्री मध्यरात्री हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी पीडितेने भद्रकाली पोलिसात तक्रार दाखल केली असून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधीत तरुणी शिर्डीला जाण्यासाठी सीबीएस स्टॅण्डवर  बसची वाट पाहत उभी होती. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या एका अनोळखी तरुणाने चुलत भावाचा मित्र असल्याचे सांगत फुस लावून तरुणीला दुचाकीवर बसवले. त्यानंतर सीबीएसजवळील कान्हेरेवाडी येथील बंद पडलेल्या हॉटेलच्या आवारात नेत बलात्कार केला, अशी तक्रार पीडितेने नोंदवली आहे. भद्रकाली पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.