Sun, Mar 24, 2019 13:06होमपेज › Nashik › अल्पवयीन मुलीवर कान्हेरेवाडीत बलात्कार

अल्पवयीन मुलीवर कान्हेरेवाडीत बलात्कार

Published On: May 22 2018 1:28AM | Last Updated: May 21 2018 11:17PMनाशिक : प्रतिनिधी 

शिर्डी येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत असलेल्या राहाता तालुक्यातील 16 वर्षीय मुलीवर अज्ञात युवकाने दुचाकीवरून घेऊन जात कान्हेरेवाडी येथे बलात्कार केल्याची घटना रविवारी (दि.20) मध्यरात्री घडली. या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून, भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार शिर्डीला जाण्यासाठी ती सीबीएस बसस्थानक येथे रात्री एकच्या सुमारास बसची वाट पाहत होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका अनोळखी तरुणाने मी अमोल सांगळे याचा मित्र असून, त्याच्या चुलत भावाकडे तुला घेऊन जातो, असे खोटे सांगून तिला दुचाकीवर बसवले. त्यानंतर त्याने तिला सीबीएसजवळील कान्हेरेवाडी येथील बंद पडलेल्या हॉटेलच्या आवारात नेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडितेने पोलिसांशी संपर्क साधला. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात तरुणाविरुद्ध भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.