Sun, Jul 05, 2020 23:18होमपेज › Nashik › वाळूचोरीस अटकाव : तलाठ्यास दमदाटी

वाळूचोरीस अटकाव : तलाठ्यास दमदाटी

Published On: Dec 25 2017 1:19AM | Last Updated: Dec 24 2017 11:38PM

बुकमार्क करा

मालेगाव : प्रतिनिधी

डाबली येथील नदीपात्रातून गौणखनिज चोरीस अटकाव करणार्‍या तलाठ्यास अरेरावी करीत, कारवाई करीत असलेला ट्रॅक्टर बळजबरीने नेणार्‍या दोघांविरोधात वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी डाबलीच्या तलाठी जयश्री मोरे यांनी फिर्याद दिली आहे. 

गावालगतच्या मोसमनदी पात्रातून अवैधरीत्या मातीचे उत्खनन करून ती चोररू नेणार्‍या जीवन भाऊसाहेब हिरे (रा. कलेक्टरपट्टा) व त्याच्या ट्रॅक्टरचालकास तलाठी मोरे यांनी प्रतिबंध करत कारवाई केली. त्यामुळे संतापलेल्या हिरे याने तलाठी मोरे यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यांनी कारवाई केलेला ट्रॅक्टर बळजबरीने पळवून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणामुळे वाळूमाफियांची दहशत पुढे आली असून पोलिसांसह गौणखनिज विभागाने कारवाईचा बडगा तीव्र करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.