Fri, Aug 23, 2019 21:58होमपेज › Nashik › लष्करी जवान अपघातात ठार

लष्करी जवान अपघातात ठार

Published On: Jun 17 2018 1:36AM | Last Updated: Jun 16 2018 11:49PMघोटी : वार्ताहर

मुंबई-नाशिक महामार्गावरील माणिकखांब शिवारात दुपारी बारा वाजता शनिवारी (दि.16) चालकाचे नियंत्रण सुटून अपघातात लष्करातील जवान ठार झाला.

मुंबईमार्गे नाशिककडे जाणार्‍या हुंडाई कारमधून (क्र.एपी 28 जेपी 5364) दुपारी बारा वाजता चालक हारजिंदर सिंग हे पत्नी सोनाली सिंगसोबत देवळाली कॅम्पकडे जात होते. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटल्याने चालक हारजिंदर सिंग यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी सोनाली हिस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.