Fri, Aug 23, 2019 23:15होमपेज › Nashik › नाशिक मध्ये लष्कराचे विमान कोसळले(व्हिडिओ)

नाशिक मध्ये लष्कराचे विमान कोसळले(व्हिडिओ)

Published On: Jun 27 2018 11:42AM | Last Updated: Jun 27 2018 12:16PMनाशिक : प्रतिनिधी

येथील पिंपळगाव बसवत गावा जवळील गोलठाण येथे विमान कोसळले आहे. कोसळलेले विमान लष्‍कराचे सुखोई ३०-२१० हे असून, तांत्रिक अडणीमुळे हे विमान कोसल्‍याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेत विमान पूर्णपणे जळून खाक झाले असून, विमानातील तिन्ही पायलट पॅराशुटच्या मदतीने बाहेर पडल्‍याने सुखरुप बचावले आहेत. 

जवानांचा नियमित सराव सुरु  असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान दुर्घटनाग्रस्त झाले. विमानात बिघाड झाल्याचे लक्षात येताच, पायलटने त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, विमान नियंत्रणात येत नसल्‍याने को पायलटसह तिघांनी विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने खाली उड्या मारल्या. सध्या या तिघांचीही प्रकृती सुखरुप असून, प्राथमिक उपचारासाठी त्‍यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दरम्यान, हे विमान शेतात कोसळल्याने सुदैवाने मोठी हानी झाली नाही. विमान कोसळल्याचे समजताच पिंपळगाव बसवंत येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.  पोलिस आणि जिल्हाधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे.