Fri, Apr 26, 2019 18:17होमपेज › Nashik › नाशिकचे मिलिंद खैरनार यांना मरणोत्तर शौर्यचक्र

नाशिकचे मिलिंद खैरनार यांना मरणोत्तर शौर्यचक्र

Published On: Jan 26 2018 1:17AM | Last Updated: Jan 25 2018 11:49PMनवी दिल्ली : 

नाशिक येथील वीर जवान मिलिंद खैरनार यांनी  दाखविलेल्या  साहस व विलक्षण धाडसाची दखल घेत त्यांना मरणोत्तर शौर्यचक्र जाहीर झाले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (दि.25) सेना दलाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. 

जम्मू-काश्मीरमध्ये बांदिपोरा जिल्ह्यात  राष्ट्रीय रायफलचे जवान खैरनार यांनी 10 ऑक्टोबर 2017 ला रात्री झालेल्या दहशतवादी  हल्ल्यात निकराने लढा दिला. हाजीन गावामध्ये रात्री झालेल्या  शोध मोहिमे दरम्यान, 11 ऑक्टोबर 2017 च्या मध्यरात्री पाच ते सहा दहशतवाद्यांनी अचानक हल्ला चढवला. प्रत्युत्तरात खैरनार यांनी कडवा प्रतिकार करीत त्यांनी एका दहशतवाद्याला ठार मारले होते.