Tue, Nov 13, 2018 00:30होमपेज › Nashik › पेठ तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्‍का

पेठ तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्‍का

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 10 2018 11:22PMपेठ : वार्ताहर

पेठ तालुक्यातील गोंदे व परिसरातील काही गावांना सकाळच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्‍का जाणवला. दशकाभरापूर्वीपासून गोंदे परिसरात सतत सौम्य धक्के जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही वर्षांपूर्वी गोंदेनजीकच्या आमदाह डोहात भूगर्भात हालचाली झाल्याने जमिनीला अनेक किमी खोलीची मोठी भेग पडली होती.

तेव्हापासून आजवर अनेकदा या भागात सातत्याने भूगर्भातील हालचाली जाणवत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. मंगळवारी सकाळी 7.40 वाजेच्या सुमारास 2.7 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्‍का बसल्याचे पेठ तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार समजते. तालुक्यातील गोंदे, भायगाव, आड बुद्रुक, कोहोर आदी गावांतील नागरिकांनी सकाळी आपल्या घरात हा भूकंपाचा धक्‍का अनुभवला. या धक्क्याने कोणतीही जीवित्त अथवा वित्तहानी झाल्याचे आढळून आले नाही. सततच्या भूगर्भातील हालचाली आणि आवाजांनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.