Fri, Apr 19, 2019 12:22होमपेज › Nashik › म्हसरूळला गोळीबाराचा प्रयत्न

म्हसरूळला गोळीबाराचा प्रयत्न

Published On: Dec 09 2017 1:44AM | Last Updated: Dec 09 2017 1:27AM

बुकमार्क करा

पंचवटी : वार्ताहर

जनरल स्टोअर्स दुकानात बसलेल्या युवकांवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि. 8) दुपारी घडली. मात्र, हा प्रयत्न फसत असल्याचे लक्षात येताच या युवकांनी गोळीबार न करताच पळ काढला. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मागील एका खुनाचा बदला घेण्यासाठी हा प्रकार घडल्याची परिसरात चर्चा आहे.

म्हसरूळ येथील गणेशनगर परिसरातील गणपती मंदिरासमोरील राधाई जनरल स्टोअर्समध्ये मालक भूषण पगारे आणि त्यांचे मित्र हेमंत आहेर बसले होते. यावेळी वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून येथे दोन जण आले. वस्तू आणण्यासाठी भूषण पगारे मागे फिरला असता दोघांनी गावठी कट्टे काढले. याची कुणकुण भूषण पगारेला लागली असता तो दुकानातील फ्रिजच्या मागे लपला, तर हेमंत अहिरे दुकानातून बाहेर पळाला. आपला मनसुबा उधळल्याचे लक्षात येताच दोघांनीही पळ काढला.

याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयित विराज पारधी आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेला मागील एका हत्येची पार्श्‍वभूमी असल्याचे बोलले जात आहे. 17 ऑगस्ट रोजी सराईत गुन्हेगार निखिल ऊर्फ बाल्या मोरे याची जॉन काजळे, शरद पगारे, अमर गांगुर्डे, आरिफ कुरेशी, रोशन ऊर्फ लाट्या पगारे आणि त्यांच्या तीन साथीदारांनी हत्या केली होती.त्यातूनच हल्ला करण्यात आल्याची चर्चा आहे.