Mon, Jul 22, 2019 00:43होमपेज › Nashik › नाशिक : सहा हजार सभासदांची कर्ज माफी झाली

नाशिक : सहा हजार सभासदांची कर्ज माफी झाली

Published On: Dec 12 2017 6:20PM | Last Updated: Dec 12 2017 6:20PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी 

कळवण प्रतिनिधी राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कळवण तालुक्यातील पाच हजार  ९६९ कर्जदार सभासदांची ३७ कोटी २४ लाख ६५ हजार रुपयांची कर्ज माफी झाली असल्याची माहिती नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक धनंजय पवार यांनी कळवण येथे दिली.  

शासनाकडून कळवण तालुक्यातील पाच हजार  ९६९ कर्जदार सभासद शेतकऱ्यांची ग्रीन लिस्ट प्राप्त झाली आहे.  त्यात तालुक्यातील १.५० लाख रुपयाच्या आतील तीन हजार सहाशे ६० शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी मिळाली असून त्यांची कर्जाची एकूण रक्कम २१ कोटी ७४ लाख ८१ हजार सतरा रुपये आहे, सदर रक्कम जिल्हा बँकेच्या संबंधित शाखेत कर्जदार सभासदाच्या कर्ज  खात्यात जमा करण्यात अली आहे. तर उर्वरित दीड लाखावर कर्ज असलेल्या एकहजार सातशे एकोणवीस शेतकऱ्यांसाठी १४ कोटी ४४ लाख ४६ हजार रुपये शाहसनाकडून मंजूर करण्यात आले आहेत. मात्र संबंधित कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ घेण्यासाठी दीड लाखाच्या वारील रक्कम ३१ मार्च २०१८ पर्यंत भरणे आवश्यक आहे.   

या शिवाय तालुक्यातील नियमित कर्जदार असलेल्या ५९० कर्जदार शेतकऱ्यांसाठीहि प्रोत्साहन रक्कम म्हणून एक कोटी ५ लाख ३८ हजार रुपये मंजूर झाले आहेत. तालुक्यातील १.५० लाखावरील कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांनी आपली उर्वरित रक्कम लवकरात लवकर भरून पूर्ण कर्ज माफीचा लाभ घ्यावा असे आवाहन धनंजय पवार व बँकेचे विभागीय अधिकारी जयवंत बोरसे यांनी केले .