Sat, Feb 23, 2019 18:22होमपेज › Nashik › चोक्सीचा घोटाळा आर्थिक आणीबाणी

चोक्सीचा घोटाळा आर्थिक आणीबाणी

Published On: Feb 12 2019 1:08AM | Last Updated: Feb 12 2019 1:08AM
पंचवटी : वार्ताहर 

पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून परदेशात पळून गेलेल्या मेहुल चोक्सी आणि त्याच्या अन्य कंपन्यांच्या 19 संचालकांनी भारतातील विविध बँकाकडून तब्बल 53 हजार 898. 30 कोटींचे कर्ज घेतले असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या रकमेचे कर्ज घेताना एकाही बँकेला सोने वा मालमत्ता तारण दिलेली नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळा असतानाही सरकार यातील एकाही संचालकांवर कारवाई करीत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी केला आहे.

चोक्सी याने केलेल्या घोटाळ्याचा विचार करता सर्व देशशतील बँका डबघाईस गेल्यास याचा फटका सर्व सामान्य बँक ग्राहकांना बसणार आहे. यातून मोठी आर्थिक आणीबाणी येऊ शकते. यासाठी संचालकांवर आरोप निश्‍चित करून गुन्हे दाखल करून त्यांच्या प्रॉपर्टी सील करून पैसे वसूल करण्याची मागणी जानी यांनी केली आहे. यासाठी त्यांनी सहयोगी असलेल्या 19 कंपन्यांची यादी आणि त्यांनी घेतलेल्या कर्जाची यादी देखील जाहीर केली आहे.