Wed, May 22, 2019 07:19होमपेज › Nashik › शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देणारा नाशिकचा असाही भक्त  

शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देणारा नाशिकचा असाही भक्त  

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 21 2018 11:17PMनाशिक : प्रतिनिधी

कार्यकर्ते अन् समर्थक अनेक असतात. परंतु, त्यापैकी एखादाच निस्सीम भक्त होतो आणि तेही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. नाशिकमधील मीनानाथ जाधव असे या भक्ताचे नाव आहे.  20 वर्षांपासून न चुकता तो शिवसेनाप्रमुखांच्या भेटीला जातो. यावेळीही मीनानाथ 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या समाधीवर डोके टेकवून त्यांना मानवंदना देण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहे. केवळ मुंबई येथील भेटच नव्हे, तर घरी आणि दररोज व्यवसायाची सुरुवात करण्यापूर्वीदेखील तो शिवसेनाप्रमुखांची आरती करतो आणि मगच कामाला लागतो.

राजकारण असो की चित्रपटसृष्टी. या दोन्ही क्षेत्रातील मान्यवरांचे अनेक चाहते असतात. त्यांच्या गोष्टीही थक्क करणार्‍या असतात. नाशिकमधील या मावळ्याने शिवसेनाप्रमुखांची ते ह्यात असेपर्यंत 15 वेळा भेट घेतली. तसेच, आता त्यांच्या जयंतीनिमित्त गेल्या पाच वर्षांपासून तो शिवाजी पार्कवर स्मारकावर डोके टेकविण्यासाठी न चुकता जातो. दोन भगवे झेंडे, मानवंदना देण्यासाठी दोन तुतारीवाले आणि स्मारकावर टाकण्यासाठी जय श्रीराम अक्षरे लिहिलेली शाल तो सोबत घेऊन जातो. घरात बाळासाहेब ठाकरे यांची साडेसहा फुटाची प्रतिमा आणि दुकानातही प्रतिमा लावून तो दररोज सकाळ सायंकाळी न विसरता पूजा अर्चा करतो. नसेल त्या दिवशी घरातील त्याची पत्नी मीना जाधव या पूजा करतात. इतकेच नव्हे, तर त्याने गळ्यात सोन्याच्या लॉकेटमध्ये शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा लावली आहे.