Tue, Nov 13, 2018 10:07होमपेज › Nashik › वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बदल्या

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 22 2018 12:07AMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी जिल्ह्यातील 24 वैद्यकीय अधिकार्‍यांच्या हाती बदलीचे आदेश सोपवून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आचारसंहितेचे  उल्लंघन केल्याची बाब उजेडात आली आहे.विलंबाने आदेश देण्यामागे नेमके कोणाचे आणि काय हित दडले आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

जिल्ह्यात एकूण 111 प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, या ठिकाणी कार्यरत असलेल्या एकूण 107 वैद्यकीय अधिकार्‍यांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात आली होती. एकाच ठिकाणी तीन वर्षे वा त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या वैद्यकीय अधिकार्‍याला बदलीसाठी पात्र धरण्यात आले होते. त्यानुसार सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून हरकती मागविण्यात आल्या होत्या. दरम्यानच्या काळात प्राप्त हरकतींचे निराकरण करण्यात आले खरे. पण, बदलीचे आदेश देण्यासाठी मात्र थेट आचारसंहिता लागू होण्याची वाट बघण्यात आल्याचे समोर आले आहे.

शुक्रवारी विधान परिषदेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी आरोग्य विभागाने बदली झालेल्या 24 अधिकार्‍यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत कार्यालयात बोलावले. या ठिकाणी आल्यावर संबंधितांच्या हातावर बदलीचे आदेश सोपविण्यात आले. खरे तर जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या समितीमार्फत बदल्यांची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. 

 

Tags : nashik, nashik news, Medical Officers, Transfer,