Sun, May 26, 2019 13:31होमपेज › Nashik › सायबर जनजागृतीसाठी माध्यमांचे सहकार्य महत्त्वाचे : डॉ. सिंगल

सायबर जनजागृतीसाठी माध्यमांचे सहकार्य महत्त्वाचे : डॉ. सिंगल

Published On: Jan 30 2018 1:52AM | Last Updated: Jan 30 2018 12:57AMनाशिक : प्रतिनिधी

माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे सायबर सुरक्षितता महत्त्वाचा विषय बनला आहे. त्यामुळे याविषयी जास्तीत जास्त जनजागृतीसाठी माध्यमांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्‍त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. 

पोलीस आयुक्‍त कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सायबर सुरक्षितता या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी पोलीस उपायुक्‍त श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, विजयकुमार मगर यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे आदी उपस्थित होते. डॉ. सिंगल यांनी सांगितले की, सध्या ऑनलाइन शॉपिंग, बँकिंगचे व्यवहार वाढले असून, त्यासाठी स्मार्ट फोनचा वापरही वाढला आहे.

हे व्यवहार आबालवृद्ध करीत असल्याने काहींना या तंत्रज्ञानाचे फायदे-तोटे माहिती आहेत, तर काही अज्ञान आहेत. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना सावधानता घेण्याची गरज असून, त्याबाबत जनजागृती करणे महत्वाचे आहे. ही जनजागृती माध्यमांमार्फत केल्यास त्याचा निश्‍चितच फायदा होतो. त्यामुळे सायबर विश्‍वातील जनजागृतीसाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे डॉ. सिंगल यांनी सांगितले.