Fri, May 24, 2019 06:25होमपेज › Nashik › सटाणा शहरात सकल मराठा समाजबांधवांचा ठोक मोर्चा

सटाणा शहरात सकल मराठा समाजबांधवांचा ठोक मोर्चा

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 26 2018 11:46PMसटाणा : वार्ताहर

सकल मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी वकील संघाने गुरुवारी (दि.26) शहरात मुख्य मार्गांवरून ठोक मोर्चा काढला. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. वकील संघाने आंदोलनाला पाठिंबा दिला. 

न्यायालयापासून मोर्चास सुरुवात झाली होती. मोर्चा देवमामलेदार मंदिर, पेठ गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज पुतळामार्गे महामार्गावरून तहसीलदार कार्यालयापर्यंत गेला. वकील संघाचे अध्यक्ष पंडितराव भदाणे, रेखा शिंदे, वसंत सोनवणे, मधुकर सावंत आदींनी मनोगत व्यक्‍त केले. तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी अ‍ॅड. नाना भामरे, पी. के. गोसावी, ए. एल. पाटील, शोनकुमार देवरे, नीलेश डांगरे, प्रणव भामरे, यशवंत पाटील, विनोद सोनार, रमेश तांबट, साहेबराव पवार, अजय पाटील, सचिन खैरनार, नीलेश महाजन, रवींद्र गरुड, ए. एस. आहिरे आदी उपस्थित होते.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन

सटाणा : बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि.26) येथे तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण आंदोलन करण्यात आले. बायपास तालुक्यासाठी कायमस्वरूपी तहसीलदार नियुक्‍तीची मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. 

आंदोलनात आ. दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष अमोल बच्छाव, काँग्रेस तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया, शहराध्यक्ष किशोर कदम, कृउबा संचालक केशव मांडवडे, प्रवीण सोनवणे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, विजय वाघ, यशवंत आहिरे आदी उपस्थित होते.