Mon, Aug 19, 2019 04:56होमपेज › Nashik › मनमाडजवळ भीषण अपघातात चार ठार

मनमाडजवळ भीषण अपघातात चार ठार

Published On: Dec 05 2017 1:46AM | Last Updated: Dec 04 2017 11:27PM

बुकमार्क करा

मनमाड : वार्ताहर

इंधन वाहून नेणार्‍या भरधाव टँकरने मोटारसायकलला पाठीमागून जबर धडक दिल्याने तीन जण जागीच ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी (दि.4) सकाळी मनमाड-मालेगाव रोडवर दहेगाव शिवारात ही घटना घडली. हा अपघात नसून घातपात असल्याचे सांगत मृतांच्या नातेवाईकांनी टँकरचालकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील संतोष चितळकर, आशा चितळकर आणि भूषण चितळकर जागीच ठार झाले. तर सविता चितळकर यांचा मालेगाव रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोषण चितळकर गंभीर जखमी आहेत. जखमींना मालेगावच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातानंतर टँकरचालक तुकाराम चितळकर पळून गेला. तो मयत संतोष चितळकरचा चुलत भाऊ आहे. मनमाडपासून जवळ असलेल्या बोयेगाव येथील संतोष चितळकर हे पत्नी आशा, मुलगा भूषण, वहिनी सविता आणि पुतण्या रोषण यांना मोटारसायकलवरून मनमाडला बँकेच्या कामासाठी घेऊन येत होते. या घटनेने बोयेगावावर शोककळा पसरली आहे.