Tue, Mar 26, 2019 01:42होमपेज › Nashik › नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण; एकाचा मृत्यू

नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण; एकाचा मृत्यू

Published On: Jun 18 2018 2:39PM | Last Updated: Jun 18 2018 2:39PMनाशिक : प्रतिनिधी

मागील भांडणाची कुरापत काढून आठ ते दहा संशयितांनी एकास बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण सुरू असतानाच त्याला उचलून जमिनीवर आपटले. यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तिचा मृत्यु झाला. राजू शेषराव वाघमारे (४५, रा. संत कबीरनगर झोपडपट्टी, गंगापूर रोड, नाशिक) असे ठार झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. 

संशयिताना अटक करावी या मागणीसाठी संतप्त नातेवाईक व मित्रपरिवाराने गंगापूर पोलिस ठाण्यात ठिय्या दिला होता. १५ जून रोजी रात्री ११ वाजता संशयित संजय लक्ष्मण खरात, कल्पेश संजय खरात (दोघे रा. संत कबीरनगर), सुंदर लक्ष्मण खरात, प्रशांत सुंदर खरात (दोघे रा. गौतमनगर, गरवारे कंपनीसमोर, अंबड, नाशिक) व त्यांचे तीन ते चार साथीदार असे हातात लाठ्याकाठ्या घेऊन राजू यांच्या घरात शीरले. 

संशयितांनी दमदाटी करीत राजू यांना उचलून जमिनीवर आपटत मारहाण केली. या घटनेतर राजू यांना रुग्णालयात दाखल केले. तसेच गंगापुर पोलिस ठाण्यात संशितावीरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला.  दरम्यान रविवारी (दि.१७) रात्री राजू यांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात जमिनीच्या वादातुन हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण बुराडे करत आहेत.